पुणे सातारा महामार्ग वर केळवडे गावच्या हद्दीत मोटर सायकलला चारचाकीची धडक! अपघातात मोटर सायकल स्वार किरकोळ जखमी.
मंगेश पवार
सारोळे प्रतिनिधी : पुणे सातारा महामार्गावर केळवडे गावच्या हद्दीत चारचाकीची मोटर सायकल स्वारला धडक दिल्या प्रकरणी मो.सा.चालक संकेत सुरेश भगत वय २६ रा. माळवाडी पोस्ट संगमनेर ता. भोर यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चारचाकी चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळवडे गावच्या हद्दीत पुणे सातारा रोडवर साताऱ्याकडे जाणाऱ्या लेन वरती दि.५/४/२४ रोजी देशी-विदेशी हॉटेलच्या जवळ अज्ञात चार चाकी वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाने भरधाव वेगात येऊन मो. सा.के टी म. क्र. MH १२ UD २५५४ धडक दिली. यामध्ये मोटरसायकलस्वार संकेत भगत यांना डोक्याला हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे.याप्रकणी राजगड पोलीस स्टेशनला अज्ञात चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास सपोफौ चव्हाण करीत आहे.