भविष्यातील निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी ५४ गावच्या लाभ क्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी सर्तक राहावे! – डॉ.भारत पाटणकर
सातारा जावळी : बजरंग चौधरी
बोंडारवाडी धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांचा १८ ऑगस्टला जाह
सातारा : बोंडारवाडी धरण क्षेत्रातील लाभार्थींनी दि . १८ ऑगष्ट रोजी होणाऱ्या मेळाव्याला आपआपले ७ /१२ घेऊन मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन श्रमिक मुक्ती दल अध्यक्ष व बोडार वाडी धरण कृती समितीचे प्रमुख मार्गदर्शक डॉ . भारत पाटणकर यांनी केले . केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकित ते बोलत होते . यावेळी आदिनाथ ओंबळे ,नारायण धनावडे , नारायण सुर्वे , एकनाथ सपकाळ , राजेंद्र जाधव , जगन्नाथ जाधव , विकास शिर्के , सुरेश कासुर्डे , शिवाजी बेलोशे , सौ उषा उंबरकर बाजीराव धनावडे ,श्रीरंग बैलकर , अशोक पार्टे , राजाराम जाधव , विजय सपकाळ , राजेंद्र खुडे , पुंडलिक पार्टे , अमोल आंग्रे , शिवराम शेलार , लक्ष्मण शेलार, भामघर ग्रामस्थ यांसह ५४ गावातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच मोठ्या संख्येने उपस्थीत होते . डॉ पाटणकर पुढे म्हणाले बोंडारवाडी धरण होणार हे १०० % खरे आहे . परंतू आगामी विधान सभा निवडणूक आचार संहिता लागू होण्या पुर्वी या प्रकल्पाच्या शुभारंभाचा नारळ फूटून त्याला गती मिळाली पाहिजे तसेच या प्रकल्पात बाधित गावांना व शेतकऱ्यांना प्राधान्याने योग्य मोबदला व पुनर्वसन लाभ मिळावा यासाठी मी व कृती समिती सरकार दरबारी आधी पुर्नवसन मग धरण या मार्गणी साठी आग्रह करणार आहे . भविष्यात निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी ५४ गावांच्या लाभ क्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे . या साठी पुढील धोरण ठरवण्या साठी सर्वानुमते दि . १८ ऑगष्ट रोजी भव्य मेळावा घेण्यात आला असून मुंबई , पुणे व अन्यत्र विस्थापित शेतकऱ्यांनी आप आपले ७ /१२ , खाते उतारे घेवून टाळाटाळ न करता या बैठकीला स्वतः जातीने हजर रहावे असे आवाहन करण्यात आले .


