अंगणवाडी केंद्र 2 ऊत्रोली मध्ये मतदान जनजागृती अभियान राबविले.
भोर प्रतिनिधी : मतदान जनजागृती काळाची गरज,निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविलं तर त्याला न भुलता ‘माझे मत माझे भविष्य’ व ‘एका मताचे सामर्थ्य’ यासंबधी विविध स्पर्धा आयोजित करून मतदार राजाला जागृत करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर अनेक सामाजिक कार्यकर्ते संस्था करत असतात. यामध्ये निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हीडिओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, घोष वाक्य स्पर्धा, सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत असते.
योग्य उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ते माझे राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी आहे,ही जनजागृतीनेच मतदानाची टक्केवारी वाढेल.
यांचं उद्देशाने अंगणवाडी केंद्र 2 ऊत्रोली मध्ये आज मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
विद्यार्थी नी प्रभात फेरी काढून आपल्या पालकांना मतदान करण्याचं आवाहन फलक दाखऊन केले.
तसेच विद्यार्थी चे कलागुणांना वाव प्रोत्साहन मिळावे व त्यामध्ये पालकांचा सहभाग असावा यासाठी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा पालक संतोष कदम व सर्व पालकांच्या सहकार्याने घेऊन
स्वतः चे वाढदिवस निमित्त वृक्षारोपण विद्यार्थी चे मार्फत केले.
यावेळी अंगणवाडी सेविका सौ मीना शिवतरे,सौ वंदना शिवतरे,
पालक सौ विशाखा शेंडगे , पुजा शिवतारे, धनश्री सुतार , सविता ननावरे , कविता सुतार , चांगुणाबाई शिवतरे
विद्यार्थी व पालक उपस्थित होते.