भुईंज येथे इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचा संदेश.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील भुईंज येथील सर्व मुस्लिम बांधव हे आपले बंधूच असून या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्वधर्मसमभाव ही सदभावना जपणारे भुईंजगावं असल्याचे मत भाजपा नेते गजानन भोसले यांनी व्यक्त केले.
या वेळी भोसले म्हणाले भुईंज हे सुशिक्षित लोकांचे शहर असून या गावांमध्ये जाती-धर्मापेक्षा माणुसकी जास्त जपली जाते. या गावामध्ये कोणत्याही जाती-धर्माकडे न पाहता मानवता,प्रेम,आपुलकीने वागवले जाते असे ते म्हणाले.आपण सर्वजण यापुढेही पवित्र रमजान मासानिमित्त मुस्लिम बांधवांच्या जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीची परंपरा जपण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे सरपंच विजय वेळे यांनी सांगितले.
भुईंज ग्रामस्थांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
भुईंज ग्रामस्थांच्या वतीने ही दरवर्षीप्रमाणे अतिशय नियोजनबद्ध अशा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. ही इफ्तार पार्टी म्हणजे आमच्या घरातीलच एक कार्यक्रम असल्यासारखे वाटते असे मत भुईंज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे यांनी बोलताना सांगितले. दरवर्षी प्रमाणे भुईजच्या सरपंचांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केल्याने आम्हाला रोजा सोडता आला असे मत आरिफभाई मोमीन यांनी व्यक्त केले.
या इफ्तार पार्टीचे निमित्त जामा मस्जिद भुईंज येथे भाजपा नेते गजानन भोसले सोसायटी चेअरमन मदन शिंदे माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव सरपंच विजय वेळे दौलतराव भोसले प्रशांत खरे वसंतराव वारागडे प्रमोद जाधवराव रवींद्र जाधव गणेश शिंदे हेमंत भोसले सुधीर धुरगुडे’विनोद जाधव,मदन कुचेकर,यांची प्रमुख उपस्थीती होती.मौलाना मोहिबूल्ड्डाह शेख यांनी मार्गदर्शन करीत उपस्थिता़ंना शुभाशिर्वाद दिले.
या वेळी मुस्लिम समाजाचे नेते,आरिफ भाई मोमीन, इब्राहिम मोमीन.युसुफ भाई मोमीन. इर्शाद मोमीन .समृद्धीन मोमीन .हाजीसलीम मोमीन.मुस्तफा मोमीन,मुसद्दीक मोमीन,सादीक मोमीन,खाजाभाई शेख. यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
चौकट:माजी मंञी प्रतापराव भोसले भाऊंनी सर्वधर्मसमभावाचे संस्कार आमच्यावर रुजवले आहेत. त्यामध्ये आम्ही कधीच खंड पडू देणार नाही. त्यांनी दिलेली मानवतेची, आपुलकीची शिकवण आम्ही नवी पिढी या नात्याने सदैव जपू,जात-धर्म यापलीकडे भाऊ-भाऊ म्हणूनच आमचे नाते ओळखले जावे.इतके प्रेम आम्ही एकमेकांवर करु. आपली भुईंज हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरणारी आहे.यातूनच गावाचा विकास, प्रगती होणार आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्वांना भेटून सर्व मुस्लिम बांधवांशी संवाद साधता आला यांचा आनंद आहे.


