धावडशी शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी उभारली शैक्षणिक गुणवत्तेची गुढी.


 

सातारा प्रतिनिधी : आशिष चव्हाण

जिल्हा परिषद सातारा आयोजित ‘गुढी पाडवा,पट वाढवा’ या अभियाना अंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडशी येथे आयोजित कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे यांनी भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यानी उपस्थिताचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. आरोही देवरूखकर या विद्यार्थीनीने औक्षण केले. शाळेच्या वैशिष्ट्याने सजविलेली शैक्षणिक गुणवत्तेची गुढी मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते उभारण्यात आली. इयत्ता पहिलीच्या दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविधरंगी फुग्यांची कमान, कार्टूनचे कट आउट, रांगोळी ची सजावट करून शैक्षणिक वातावरण निर्मिती केली होती इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या या बालच मुलींच्या स्वागतासाठी प्रत्यक्षात स्पायडरमॅन ही अवतरला होता.

डिसेंबर महिन्यात पालक मीटिंग घेऊन, दाखल पात्र मुलांचा नवीन वर्ग बालिका दिन ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडशी येथे केला जातो या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे याशनी नागराजन यांनी कौतुक केले व हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवावा यासाठी सर्वांना आवाहनही केले. या दाखल पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. मुलांचे शब्द वाचन, अंक वाचन, सभाधिटपणा याचे मान्यवरांनी खूप कौतुक केले. परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस सुरू केली आहे याबद्दल समाधानही व्यक्त केले. यानंतर सर्व मुलांचे वही, पेन्सिल, गुलाब पुष्प देवून व औक्षण करून स्वागत करण्यात शाळेतील सर्व उपक्रम व गुणवत्ता पूर्ण कार्यक्रम याचा त्यांनी आढावा घेतला व प्रशंसा केली. शाळेस शासन व जिल्हा परिषदे कडून प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्यांचे पेट्या व पुस्तके यांचेही निरीक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. या साहित्याचा वापर नियमितपणे अध्ययन-अध्यापनामध्ये करावा असेही यावेळी त्यांनी आवर्जून सर्व शिक्षकांना सांगितले.

ADVERTISEMENT

याप्रसंगी इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या बालकाचे शाळेतील पहिले पाऊल उमटवण्यात आले. शाळेच्या गुणवत्तेबद्दल गौरवोद्गार काढताना शाळेच्या दाखलपात्र विद्यार्थ्याचे वर्ग तीन जानेवारी – बालिका दिनापासून सुरु करण्याच्या या उपक्रमाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा व त्याप्रमाणे कामकाज करावे अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केली. सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांची पटन नोंदणी आजच झाली त्याबद्दल इयत्ता पहि. प्रिशा निलेश पवार या विद्यार्थिनींनी सादर केलेले झाशीच्या राणीचे मनोगतही त्यांनी ऐकले व तिचे कौतुक त्यांनी केले. आजच्या या प्रवेशदिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेकडून गोड शिरा देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल जायकर सर यांनी करताना गुणवत्ता वाढीसाठी शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ राजश्री देवरुखकर उपाध्यक्ष सौ संगीता ढाणे उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ सुनीता देवकर मॅडम यांनी केले. आभार सौ सारिका चौधरी मॅडम यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!