उत्कृष्ट निवेदक” पुरस्काराने विठ्ठल पवार सर यांना गौरवण्यात आले.
सारोळे : भोर तालुका वन खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये निवेदन व सूत्रसंचालन क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामामुळे “उत्कृष्ट निवेदक ” हा पुरस्कार भोर तालुक्यातील करंदी गावातील” विठ्ठल पवार सर” यांना किरणजी केंद्रे कार्यकारी संपादक बालभारती, हनुमंत चांदगुडे, महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक व पाठ्यपुस्तकातील कवी यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.
कोणत्याही कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो तो निवेदक आणि निवेदकाच्या सूत्रसंचालन करणाऱ्याच्या अंगी वाचन, अभ्यास आणि स्मरणशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. विठ्ठल पवार सर हे सामाजिक, राजकीय प्रहार करणारे उत्कृष्ट निवेदक आहे.
निवेदक हा कार्यक्रमाचा आत्मा असतो. कार्यक्रमामध्ये वक्ते आणि नेत्यांना सांभाळून घेण्याची क्षमता निवेदकामध्ये असते.
त्यांच्यासारखा निवेदक भोर तालुक्याला लाभला हे भाग्यच आहे.
यावेळी महाराष्ट्रातील साहित्यिक लक्ष्मण शिंदे, सहकार क्षेत्रातील नामवंत प्रामाणिक लेखापरीक्षक बाळासाहेब शिंदे, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सभासद यांच्या उपस्थित हा सन्मान देण्यात आला.
लहानपणापासूनच मला निवेदन करण्याची आवड होती.वाचनाची आवड असल्याने निवेदन प्रवास झाला.चुकत चुकत सुधारणा होऊन निवेदन करण्याचा प्रयत्न केला.
कुठेही निवेदन करताना मानधनाची अपेक्षा न ठेवता कमी मानधनांमध्ये निवेदन करतो.
विठ्ठल पवार सर प्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार.


