लोणंद शहरामध्ये सहा अंगणवाडी खोल्या नसल्याने पावसाळ्यात मुलांची परवड संबंधित अधिकारी लक्ष देतील काय?
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरामध्ये अंगणवाडी ला खोल्या उपलब्ध नसल्याने मिळेल तेथे सहा अंगणवाड्या भरवले जातात ही परवड लहान बालकांसाठी पावसाळ्यात धोक्याची घंटा आहे संबंधित प्रशासनाने वेळी दखल घेतले नाही तर पालक वर्ग आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहेत लोणंद शहराचा झपाट्याने विकास होत आहे आणि अनेक अंगणवाड्या पूर्ववत आहेत तर काही अंगणवाड्याला जागा व्हावी तारेवरची कसरत करावी लागत आहे ही एक शोकांतिका झाली आहे शहरातील अंगणवाडी क्रमांक 161 अंगणवाडी क्रमांक 162 अंगणवाडी क्रमांक 160 अंगणवाडी क्रमांक 182 अंगणवाडी क्रमांक 171 यांना उपलब्ध खोल्या नसल्याने पावसाळ्यात दिवसात लहान बालकांची परवड सुरू आहे तरी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रशासनाने अडचण दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

 
			

 
					 
							 
							