प्रशस्तीपत्र सुपूर्द करीत पुणे परिमंडळाकडून अभियंता पुरुषोत्तम कुंजीर यांचे तोंडभरून कौतुक..
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) यांच्या संयुक्तं विद्यमाने पुणे येथे’फोरम ऑफ रेग्युलेटर्स’
अर्थातच “नियामकांचा मंच”या कार्यक्रमादरम्यान ९१व्या बैठकीचे दि.७ते९जून रोजी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय विद्युत नियामक आयोग (CERC)तसेच
भारत देशाच्या एकूणच सर्व राज्यांची राज्य विद्युत नियामक आयोग (SERC’s) असे सर्व आयोगाचे अध्यक्षांनी या मंचावर हजर राहत आपली उपस्थिती दर्शवली.
या राष्ट्रीय पातळीच्या बैठकीच्या आयोजनासह उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठीची स्थानिक पातळीवरिल सहकार्य करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने महावितरणचे पुणे परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात समावेश असलेले रास्ता पेठ येथील प्रतिनिधी, सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम अनंतराव कुंजीर यांस स्थानिक पातळीवर मिळालेल्या राष्ट्रीय बैठकीच्या नियोजन आणि आयोजन करण्याची जबाबदारी महावितरण मुख्यालायाकडून एक प्रतिनिधी म्हणून महावितरण मुख्यालायाकडून जी जबाबदारी सोपविली गेली,त्या जबाबदारीचे त्यांनी कर्तव्यनिष्ठेने पालन करत पार पाडली.त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचे कौतुकास्पद आभार प्रदर्शन करण्यासाठीं प्रशस्तीपत्र पाठविलेलें पाहवयास मिळाले.
त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे तसेच दिलेल्या योगदान यामुळें पुणे परिमंडळाचे देखील नाव उंचावले त्यासानिमित्त पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी देखील ते प्रशस्तीपत्र सुपूर्द करीत त्यांचे आभार मानले.

