सातारा पुणे महामार्गावर किकवी गावाच्या हद्दीत कंटेनर ट्रकच्या धडकेत १मृत्यू ! १जखमी.


संपादक : मंगेश पवार

सारोळे : सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत कंटेनर ट्रकने दिलेल्या धडकेमध्ये एक्टिवा मोटर सायकल वरील एक महिला जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अश्विनी भामरे यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये कंटेनर ट्रक चालक अल्ताफ मेहबूब मुजावर वय ४८ वर्ष रा. महागाव पो. क्षेत्रमाहूली ता.जि.सातारा यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर किकवी गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दि.१४ रोजी रात्री ९:१५ वा. एक्टिवा मोटरसायकल नं एम एच ११ डीजे ६०४८ यांना पाठीमागून येणाऱ्या कंटेनर ट्रक नं. एम एच ११ सी एच ४२७९ धडक दिली आहे. या अपघातात एक्टिवा मोटरसायकल वरील मनीषा बबन मकवाने वय ४० वर्ष या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर फिर्यादी यांच्या पतीचा योगेश भामरे यांना किरकोळ जखमी करून मोटरसायकलचे नुकसान केले आहे.
यामुळे कंटेनर ट्रक चाल का विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये अश्विनी भामरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अंबादास बुरटे करीत आहेत .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!