राजगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! जेसीबी मशीन चोरणाऱ्या चोरट्यास ७२ तासाच्या आत १०लाखाच्या मालासह ठोकल्या बेड्या.
संपादक : मंगेश पवार
राजगड पोलिस स्टेशन हद्दीमधून दि.१० जून रोजी जेसीबी मशीन हे वाहन चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी अनिल शिवाजी बोडके यांनी दिली होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधीकारी तानाजी बरडे ,राजगड पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी पो ना नाना मदने यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या चोरीचा अतिशय तांत्रिक कौशल्यपूर्ण असा तपास करत अवघ्या ७२ तासाच्या आत चोरांना १० लाखाच्या मालसहित बेड्या ठोकण्यात आल्या.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ऋषिकेश भारत जागीरदार रा. लहरी ता. भोर जि. पुणे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याप्रकणी सदर वाहनाचा व आरोपींचा शोध सुरू असताना राजगड पोलिस स्टेशनचे अधीकारी मदने नाना यांना सदर जेसीबी मशीन वाहन हे सुपा ता. पुरंदर जि. पुणे या ठिकाणी असल्याची तांत्रिक विश्लेषणानुसार माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश शिरसाठ पो.ना.योगेश राजवडे, पो. हवा. राजेंद्र चव्हाण,पो. शिपाई राजू गव्हाणे,पो नाईक गणेश लडकत, पो. नाईक मयूर निंबाळकर,यांनी जेसीबी मशीन मालक यांच्या सोबतीने आरोपींना पकडण्यासाठी आपले जाळे लाऊन ठेवले होते. रात्रीच्या वेळी हे जेसीबी मशीन वाहन घेवून जाण्यासाठी हा आरोपी आल असता त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सदर कामगिरी ही तानाजी बरडे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, यांच्याद्वारे करण्यात आली. अधिक तपास पोलिस नाईक नाना मदने हे करत आहेत.


