न्हावी जिल्हा परिषद शाळेतील नवगतांची मिरवणूक काढून जंगी स्वागत.


 

संपादक : मंगेश पवार

 

सारोळे : जि.प. प्राथ. शाळा न्हावी शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष २०२४/२५ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नवागतांचे स्वागत ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक करून करण्यात आली.यावेळी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,अध्यक्ष,उपाध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक,महिला,ग्रामस्थ,युवक,विध्यार्थी कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित होते

शाळेतील सर्व मुलांना सेवा सहयोग फौंडेशन पुणे यांचे वतीने नवीन दप्तर,शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे मंगलांजली किडनी संजीवन फौंडेशन पुणे व नवज्योत परिवार ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त विद्यमाने प्रत्येकी 7वह्या,चित्रकला वही,रंगपेटी व खाऊ वाटप करण्यात आला.

ADVERTISEMENT

ग्रामपंचायत न्हावी 15 चे सरपंच भरत सोनवणे यांचेवतीने विध्यार्थ्यांना गोड जेवण देणेत आले.सर्व मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली.इयत्ता पहिली व शाळेत नवीन दाखल झालेल्या मुलांचे यावेळी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी भरत सोनवणे, दत्तात्रय कारळे,डॉ.सुमेघा मादळे,केंद्रप्रमुख संजय ताम्हाणे सर,अंकुश चव्हाण,सचिन सोनवणे, शरद सोनवणे,निलेश सोनवणे,अनिकेत भोसले,प्रमोद सोनवणे, अविनाश भोसले,निलम सोनवणे,कोमल सोनवणे, पूनम सोनवणे,सोनाली बोन्द्रे,पूजा खोमणे,संगिता सोनवणे, पूजा सोनवणे,मनिषा लोहोमकर,सारिका मोहिते व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदिप मोरेसर यांनी केले,सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक अनिल चाचरसर यांनी केले तर आभार रुपाली पिसाळ यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!