डे-नाईट फुलपिच सामन्यांसह ‘गणेश तात्या युवा चषक २०२५’चे आयोजन
मंगेश पवार
सारोळे :- भोर तालुक्यातील तरुणाईला खेळाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने गणेश (तात्या) निगडे युवा मंच यांच्या वतीने ‘गणेश तात्या युवा चषक २०२५’ या भव्य फुलपिच क्रिकेट डे-नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ ते मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा श्रीमंत श्री काळभैरवनाथ क्रिकेट ग्राऊंड, पांडे, ता. भोर, जि. पुणे येथे खेळवण्यात येणार असून, परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकास ₹४१,००१/-, द्वितीय क्रमांकास ₹३१,००१/- व तृतीय क्रमांकास ₹२१,००१/- रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ही सर्व बक्षिसे गणेश (तात्या) निगडे यांच्या तर्फे देण्यात येणार आहेत.
यासोबतच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट यष्टीरक्षक, नवोदित खेळाडू व मॅन ऑफ द सिरीज यांसाठी आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहेत. उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये ३२ इंची LED टीव्ही जिंकण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेतील सामने आठ षटकांचे असणार असून, हाफ लिग पद्धतीने खेळवले जातील. सामने गुरु लेझर टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार असून, सर्व सामने युट्युब लाईव्ह प्रसारित केले जाणार आहेत. सामने दुपारी १ वाजता बरोबर सुरू होतील.
या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी संघांकडून कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. तसेच प्रत्येक संघास टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट गणेश (तात्या) निगडे युवा मंच यांच्या वतीने मोफत देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी पंचायत समिती गण भोंगवली (भोर पूर्व भाग) यांचे विशेष सहकार्य लाभले असून,विक्रम बागल यांनी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी
रोशन निगडे (८३७९९२१३३४)
दिगंबर हिंगे (७०२०४६०६४०)
महेश मोरे (८३२९९५४२४१)
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तरुणाईचा उत्साह, खेळाची शिस्त आणि भव्य आयोजन यामुळे गणेश तात्या युवा चषक २०२५ ही स्पर्धा भोर तालुक्यातील एक लक्षवेधी क्रिकेट महोत्सव ठरणार आहे.


