रुग्णवाहिकेत सुखरूप प्रसूती: आशा वर्कर, डॉक्टर आणि पायलट यांची तत्परता वाखाणण्याजोगी.
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
खंडाळा शिंदेवाडी (देवघर पुनर्वसन वसाहत) : रिना कुमारी यांना अचानक प्रसूतीच्या तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर त्यांच्या परिचारिका आशा कंक (आशा वर्कर) यांनी तातडीने 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला कॉल केला. योग्य वेळी रुग्णवाहिका पोहोचली असून रुग्णाला शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे हलवण्यात आले.
मात्र, रुग्णाला वाटेतच प्रसूतीच्या तीव्र वेदना होऊ लागल्याने परिस्थिती गंभीर झाली. अशा संकटाच्या क्षणी रुग्णवाहिकेतच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर मंदार माळी (आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी), रुग्णवाहिका पायलट विशाल कदम आणि आशा कंक यांनी समन्वयाने आणि शांतपणे काम करत रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती पार पाडली. नवजात बाळ आणि माता दोघेही सुखरूप असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी सौ. आशा कंक यांचे, BVG 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचे, डॉक्टर मंदार माळी व पायलट विशाल कदम पुणे डिस्ट्रिक्ट मैनेजर डॉ.प्रियांक जावळे व सुपरवायझर सुजित पाटील सर यांचे मनःपूर्वक आभार मानले असून त्यांच्या तत्परतेचे व धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे..


