पहिल्या श्रावणी सोमवारी पाऊसात बनेश्वरला गर्दी
नसरापूर : ‘हरहर महादेव’च्या जयघोषात श्री क्षेत्र बनेश्वर येथे दुसर्या श्रावणी सोमवारी सुमारे हजारो भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी यावेळी सलग २ दिवस सुट्ट्या आल्याने भाविकांची संख्या मोठी होती. सलग दोन दिवस सुट्यांमुळे सोमवारच्या तुलनेतच शनिवार व रविवार या दोन दिवशीही मोठय़ा प्रमाणात भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी करून सकाळपासुन रांगा लागल्या होत्या.
बनेश्वर मंदीरात या सोमवारी एवढी मोठी गर्दी होईल याची पावसामूळे शक्यता कमी होती तरीही भर पावसात भाविकांचा महापूर बनेश्वरला लोटला होता.
या श्रावणात भाविकांकरीता दर्शनबारीची व्यवस्था नसतानाही भाविकांनी शिस्तीने हरहर महादेवच्या जयघोषात दर्शन घेत होते. श्रावणी सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बनेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने देण्यात आली.