पोलीस असल्याचे खोटे सांगून किकवी येथील शेतकरी महिलेचे सोन्याचे दागिने लंपास.
मुख्य संपादक: मंगेश पवार
सारोळे : किकवी गावच्या हद्दीत शेतातील घरासमोर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून पलायन केले.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.30/12/2024 रोजी सकाळी 09.30 वा चे सुमारास किकवी गावचे हद्दीत फिर्यादी यांच्या शेतातील घरी कोंबड्या सोडत असताना अज्ञात मोटार सायकलवरून दोन अज्ञात चोरट्यांनी जवळ येवुन आम्ही पोलीस आहे असे सांगुन चोरांचा शोध घ्यायला इकडे आलो आहे असे सांगुन गळ्यातील सोन्याचे दागिन्याची नोंद करावयाची आहे असे सांगून गळ्यातील दागिने नोंद करण्यासाठी मागितले त्यावेळी फिर्यादी यांनी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढताना निघत नसल्याने, इसमाने गळ्यातुन बळजबरीने काढुन व तोडुन घेवुन किकवीचे दिशेने मोटार सायकलवर पळुन गेले आहेत.म्हणून अज्ञात चोरट्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी राठोड करीत आहेत.