शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा : बारामतीत नियोजन बैठक, १२ ऑक्टोबरला भवानीनगरात बच्चू कडूंची सभा; भोर तालुकाध्यक्ष अजय कांबळे यांचे नागरिकांना आव्हान


दि. 14 भोर :-शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रे” संदर्भातील महत्त्वाची बैठक आज बारामती येथे पार पडली.

 

बैठकीत यात्रेचे पुढील नियोजन, विविध घटकांच्या मागण्या आणि संघटनांच्या समन्वयाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना तसेच समविचारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

यात्रेच्या निमित्ताने १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, भवानीनगर (ता. इंदापूर) येथे सकाळी ११ वाजता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व राज्याचे लोकप्रिय नेते बच्चू कडू यांची भव्य सभा होणार आहे. या सभेत शेतकरी-शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार अशा सर्व घटकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधला जाणार असून मोठ्या संख्येने शेतकरी-शेतमजूर बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ADVERTISEMENT

 

बैठकीस शरद जोशी शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक गौरव जाधव, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंगेश नानासाहेब ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा झाली.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष अजय कांबळे यांनी भोर तालुक्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने यात्रेसाठी उपस्थित राहण्याचे आव्हान केले.

 

या यात्रेतून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांचे हक्क सशक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत, सभेला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!