जिल्हा परिषद सदस्या ऍडव्हटेक जिजामाला नाईंक निंबाळकराची करंजखोप चवणेश्वर यात्रेनिमिंत्त संजय वाघ यांच्या निवासस्थानी सदिंच्छा भेट.
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे ग्रामदैवत श्री. चवणेश्वर नाथ साहेबांच्या यात्रेनिमिंत्त खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या ऍडव्हटेक सौ. जिजामाता नाईक निंबाळकर यांनी आज श्री. चवणेश्वर नाथ साहेबांचे दर्शन घेवुन गावातील ग्रामस्थांशी मन मोकळा संवाद साधला, यावेळी त्यापुढे म्हणाल्या करंजखोप सोनके रणदुलाबाद पिंपोडे अशा आपल्या ग्रामीण भागातील आपल्या सर्वांचे लाडके दादा रणजित नाईक निंबाळकर आणि माझा येथील सर्वसामान्यांच्या आणि शेतकरी बांधवांच्या घराघरात चांगलाच जनसंपर्क आहे. आपल्या या भागातील गावांना प्रथम आम्ही आत्तापर्यंत विकास कामांना प्राधान्य दिले, यामध्ये तुमचे आणि सर्वांचे लाडके दादा रणजीत नाईक निंबाळकर आणि आमच्या नाईक निंबाळकर कुटुंबाला कायम सहकार्य असू द्या: असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतर त्यांनी गावातील शेतकरी कुटुंबातील आणि नेहमीच सामाजिक धार्मिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये करंजखोप गावातील विविध कार्यक्रमांमध्ये मोठा सिंहाचा वाटा असणारे श्री. संजय वाघ यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिंच्छा भेट दिली. यावेळी समस्त वाघ परिवाराकडूंन त्यांचे प्रथम औक्षण करून स्वागत केले, यावेळी विविध विषयावर वाघ परिवारांतील सदस्यांशी मन मोकळा संवाद त्यांनी साधला वाघ परिवाराकडूंन त्यांचा पाहुणचार करण्यात आला.


