कोरेगाव युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी राजेंद्र जगताप यांची निवड.
सातारा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
कोरेगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र जगताप यांची निवड
चिमणगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात काम करणारे ह.भ.प.राजेंद्र जगताप हे वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे आणि ग्रामीण क्षेत्राशी नाळ जोडलेली असल्यामुळे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कोरेगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.यावेळी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य चे संस्थापक/ अध्यक्ष तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, युवा ग्रामीण पत्रकार संघटना पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख,दैनिक बाळकडू वृत्तपत्र पत्रकार पुणे जिल्हा उपाध्यक्ष कांता राठोड,युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख व बाळकडू पत्रकार दत्तात्रय फाळके ,ह.भ.प.नामदेराव भोसले अध्यक्ष झेप फाऊंडेशन सातारा जिल्हा,व संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

युवा ग्रामीण पत्रकार संघ सर्वाधिक पत्रकार सभासद असलेला संघ आहे.पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध असलेला संघ म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाने ओळख निर्माण केली आहे.
राजेंद्र जगताप यांनी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,झेप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे सातारा जिल्हा सचिव,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघर्ष समिती कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष अशी अनेक पदे भूषवत तालुक्यामध्ये आपल्या चांगल्या कार्यपद्धतीची ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण पत्रकार संघाला तालुक्यामध्ये चांगले नेतृत्व लाभले आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


