ऐश्वर्याला हवा होता प्रियकर, पंढरपुरात अनैतिक संबंधातून पतीने पत्नीला संपविले, आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
संभाजी पुरी गोसावी
( सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी. पंढरपूर शहरांतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अनैतिक संबंधांचा संशय आणि नेहमी सतत सोशल मीडियावर चॅट करत असल्या कारणांतून फोटोग्राफर असणाऱ्या पतीने आपल्या पत्नीचे हत्या केली आहे. ऐश्वर्या हरी सरवदे (वय 29) असे हत्या झालेल्या विवाहित पत्नीचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या सरवदे ही बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. मात्र त्याचदिवशी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडलीची देखील नोंद झाली होती. मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचे समोर आले यानंतर पोलिसांनी ऐश्वर्याच्या मृत्यूच्या सखोल तपासाबाबत सुरुवात केली. यावेळी पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी 12 मार्च रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पुढे जात तपास करत प्रथमता ऐश्वर्याचा पती हरी सरवदेला याला ताब्यात घेतले असता. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पोलिसांनी गोपनीय ठेवलेले पुरावे त्याच्यासमोर सादर केले असता. प्रथमता तो गोंधळला तरी देखील उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र अखेर गुन्ह्याची कबुली पती हरी सरवदे यांनी पोलिसांना दिली. माझी पत्नी ऐश्वर्या ही नेहमीच सतत सोशल मीडियावर चॅट व तिच्या बाह्य अनैतिक संबंधाचा संशय माझ्या मनात चांगलाच खचला होता. संतापाच्या भरातच मी तिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात फोटोग्राफर असणारा पती हरी सरवदेला अटक केली आहे. या प्रकरणांत पत्नीचे अनैतिक संबंधातून हा गुन्हा घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करीत आहेत. पंढरपूर शहरांत मागील महिन्यांतही अनैतिक संबंधातून घटना समोर आल्या आहेत.*


