सारोळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : ठाणे पोलीस आयुक्तालयातील श्रीमती शितल धाडवे यांना “DG INSIGNIA” सन्मान चिन्ह


मंगेश पवार

ठाणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या श्रीमती शितल प्रमोद धाडवे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी व उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या हस्ते प्रतिष्ठेचे “DG INSIGNIA” सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले आहे.

श्रीमती धाडवे यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परता केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान देण्यात आला असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण पोलीस विभागासह मूळ गाव सारोळे (ता. भोर) येथील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “DG INSIGNIA” हा सन्मान पोलीस दलातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला जातो, त्यामुळे हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.

श्रीमती शितल धाडवे यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळणार असून, त्यांनी पुढील काळातही अशाच प्रकारे समाजसेवा करत यशाची नवी शिखरे गाठावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!