घरफोडीत सोन्या -चांदीच्या दागिन्यांची चोरी.
संपादक मंगेश पवार
खेड शिवापूर : घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शिवापूर ता. हवेली जि. पुणे येथे घडली आहे. मोहसीन अजिज आतार वय ३२ वर्ष यांनी याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवापूर येथे दि.२६ व २७ मे रोजी शिंदेआळीत असलेल्या मोहसीन आतार यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात ३ इसमांनी घरात प्रवेश करून दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मधील शोकेस कपाट तोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३८००० रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेले आहे.
याबाबत मोहसिन आतार यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याचा अधिक तपास पो. स.इ. देठे करीत आहेत.