सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने राजापुर ग्रामस्थांच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा
कार्यकारी संपादक: सागर खुडे
दि. १३ सारोळे : राजापुर गावात गणेशोत्सव निमित्त ग्रामस्थ महिला मंडळींनी पैठणीचा खेळाचे आयोजन करण्यात आले होते.राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे यांनी तसेच हर्षद बोबडे, महेश बोबडे,शांताराम खुटवड यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
एकुणा चार फेऱ्या घेण्यात आल्या.त्यातील तीन फेऱ्यांना बक्षीस पहिल्या आणि दुसऱ्या नंबर साठी पैठणी साड्या वाटप करण्यात आले.
एकुण सहा पैठण्या वाटप करण्यात आले.राजापुर गावातील 150 ते 200 महिला सहभागी झाल्या होत्या.लहान मुले, मुली तसेच युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला मंडळाचा उस्फूर्त प्रतिसाद यावेळी लाभला.
लहान मुलांनसाठी चमचा लिंबू,खेळ ठेवण्यात आला.महिलांसाठी संगीत खुर्ची, त्यातून दोन नंबर काढण्यात आले.तळ्यात मळ्यात अशा. पद्धतीने संगीत खुर्ची साठी महिला निवडल्या जात होत्या.दुसरी स्पर्धा फुगा फुगवून तो बसून फुगवणे.ह्या साठी आयोजित करण्यात आले.त्यातून पहिला आणि दुसरा नंबर काढण्यात आले.तिसरी स्पर्धा मध्यभागी बाॅल ठेवणे.आणि काठी भोवती 10 वेढे मारणे आणि बाॅल बादलीत नेऊन टाकणे.अशा पद्धतीने पैठणी जिंकलेल्या महिलांचे विशेषतः कौतुक करण्यात आले.
संगीत खुर्ची विजयी महिलां
1) प्रतीक्षा गुडगुडे
2) सोनाली भरगुडे
फुगे फुगवणे आणि बसून फोडणे.
1) अक्षदा बोबडे
2) भारती बोबडे
बाॅल टाकणे
1) रूतुजा गुडगुडे
2) पुनम खुटवड
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शलाकाताई कोंडे उपस्थित होते.त्यांनीही संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद घेताला.ह्या स्पर्धा चे सादरीकरण ( सुत्रसंचलन) हर्षद बोबडे सर यांनी केले.
पहिल्या दुसरे आणि तिसरे बक्षीसे हर्षद बोबडे सर, महेश बोबडे, शांताराम खुटवड, सचिन खुटवड, प्रथमेश खुटवड, विकास बोबडे यांनी केले.


