अविनाश बारगळ यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला, मावळते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीड जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा
प्रतिनिधी :संभाजी पुरीगोसावी
बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर नंदकुमार ठाकूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सलग दोन वर्ष कार्यरत होते, त्यांचा बीड जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे मागील दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले, मात्र त्यांना अद्याप नवीन पदस्थापना मिळाली नाही, तर त्यांच्या जागी नव्याने अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे आणि एका जिल्ह्यात विविध पदावर कार्यरत असणारे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी आज पोलीस मुख्यालयात हजर राहून मावळते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडूंन पदभार स्वीकारला आहे, यावेळी मावळते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला आहे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी त्यांना नवीन ठिकाणी अजून नियुक्ती मिळाली नाही नंदकुमार ठाकूर यांनी सलग दोन वर्ष सेवा बजावल्यानंतर त्यांचा कार्यकाळ हा बीड जिल्ह्यात उत्कृंष्ट ठरला, बीड जिल्ह्यात त्यांनी अत्यंत चोख पद्धतीने कर्तव्य बजावलेले आहे, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यामुळे ठाकूर हे बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मना-मनात एक आपुलकीचे घर निर्माण केलं होते, त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्यामुळे आणि प्रत्येकाची तक्रार ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यात एक आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची बदली करण्यात आली आहे, बीडचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ एक चांगला अधिकारी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातही ते तेवढ्याच ताकतीने काम करून जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करतील असा विश्वांस बीड जिल्हा वासियांना निर्माण झाला आहे,*


