आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा:- पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे आदेश, समाजकंटकांवर कारवाई करा, प्रभारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक.
संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. नुकतीच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठायांतर्गत प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेवुन अमली पदार्थ,गुटखा बनावट दारू तस्करांसह अवैध धंद्याविरोधात व्यापक मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनक्षम मतदारसंघातील समाजकंटकांवर करडी नजर ठेवून संबंधितांवर कारवाईचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीतून पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठायाअंतर्गत कामगिरीचा आढावा देखील घेतला, आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या, जिल्ह्यात सर्वच विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीने होण्याची शक्यता असल्याने शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलीस यंत्रणेवर महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे, पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे लोकसभा निवडणूक जिल्ह्यात शांततेत पार पडली, त्याच पार्श्वभूमीवर प्रभारी अधिकाऱ्यांनी अलर्ट राहण्याची गरज आहे, शहरांसह ग्रामीण भागातही हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खारमोडे-पाटील जयश्री देसाई पोलीस उपअधीक्षक अजित टिके सुजित क्षीरसागर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह आदीं प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


