राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) भोर तालुक्यात कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न
मंगेश पवार
भोर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज रविवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी भोर तालुक्यातील गगुताई वाचनालय, भोर येथे भव्य कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली.
या बैठकीस विजयराव कोलते, अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) प्रमुख उपस्थित होते.
तसेच विठ्ठल शिंदे, भोर शहराध्यक्ष आणि रविशेठ बांदल, अध्यक्ष भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) युवा नेते वैभव धाडवे, पत्रकार सारंग शेटे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते
बैठकीत भोर तालुक्यातील विविध गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणे :
उत्रौली जि.प. गटासाठी
1)संदिप बापू नांगरे
2) विलास शिवतरे
शिंद भोलावडे गटासाठी
1) मानसिंग बाबा धुमाळ
कामथडी भोंगवली जि. प. गटासाठी
1) वैभव धाडवे
वेळू-नसरापूर जि. प. गटासाठी
1)गणेश खुटवड
2) गणेश बागल
कारी पंचायत समिती गणातील महिला पदाधिकारी:
1)चित्रा नितीन कुडले
उत्रौली पंचायत समिती गण
1)महेश्वरी राऊत
2) ऋतुजा अभिषेक खोपडे
शिंद पंचायत समिती गण
वंदना अंकुश मळेकर
भोलावडे पंचायत समिती गण
1)वसंत मोरे
कामथडी पंचायत समिती गण
1)आरती किरण धावले
भोंगवली पंचायत गण
1)पदमा जाधव
वेळू पंचायत समिती गण
1)महेद्र भोरडे
2)पोपटराव चौधरी
नसरापूर पंचायत समिती गणासाठी
1)माऊली कोंडे
बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
विजयराव कोलते यांनी पक्षाच्या विचारधारेवर ठाम राहून जनतेपर्यंत शरदचंद्र पवार साहेबांची भूमिका पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश खुटवड यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल शिंदे यांनी मानले.


