पुण्यात नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने वार प्रेम प्रकरणांतून तरुणाने केला जीवघेणा हल्ला ! हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल,
संभाजी पुरीगोसावी
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी. हिंजवडी पोलीस ठाणेच्या परिसरांमध्ये प्रेम प्रकरणांतून झालेल्या वादानंतर संतापलेल्या तरुणाने साथीदारांच्या मदतीने एका 18 वर्षीय तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी (दि.1 नोव्हेंबर) रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमारांस घडली. या प्रकरणात योगेश भालेराव (वय 25 ) रा. कासारसाई) त्याचा मित्र लक्ष्मण वाघमारे (वय 20 ) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी ही मूळची नाशिक येथील असून सध्या ती हिंजवडीतील साखरेवस्ती परिसरांत वास्तव्यास आहे. प्रेम प्रकरणांतून संशयितांनी आपसांत संगनमत करून 18 वर्षीय पीडित तरुणीच्या डोक्यावर,मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करीत तिला गंभीर जखमी केले आहे. तिला हिंजवडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले आहे. घटनेनंतर परिसरांत एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी योगेश भालेराव सह त्याच्या तिन्ही साथीदारांना ताब्यात घेतले आहे.


