दीपावली निमित्ताने शनी देवस्थान ट्रस्ट सोळशी तर्फे गोरगरीब आणि शनी भक्तांना दिवाळी किटचे वाटप.
उपसंपादक :दिलीप वाघमारे
तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनिश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यामार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात .या सामाजिक उपक्रमा मधील चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दीपावली सणा निमित्ताने सर्व गोरगरीब, होतकरू गरजूं मुलांना आणि शनी भक्तांना संपूर्ण पोशाख ,रवा, साखर ,तेल, रोख रक्कम देण्यात आली.गरीब होतकरू मुलांना कपडे, फटाके ,आकाश कंदील, दीपावली भेट म्हणून देण्यात येतात . मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि शिव सह्याद्री पतपेढीचे चेअरमन भाई वांगडे आणि त्यांचे सहकारी संदीप राऊत तसेच पुणे येथील उद्योजक अंकुश जाधव, आदी मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आले.
कलियुगामध्ये दानाला फार महत्त्व आहे आणि हे दान देखील सतपात्री असणे महत्वाचे आहे .दीपावली सणाच्या निमित्ताने श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सेवेकरी आणि गरीब होतकरू भाविकांना मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि भाई वांगडे ,संदीप राऊत, सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष हनुमंत वाघ, आणि अविनाश धुमाळ, अमोल निकम, , गिरीश पवार, नरेंद्र बाबर, विजय पवार, अविनाश धायगुडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी किट वाटप करण्यात आले.
सामान्य माणसाने देखील आपल्या क्षमतेनुसार पशु पक्षांना चारा धान्य पाणी याचे दान करावे तसेच आपल्या सभोवतालच्या गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार दान करावे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन दीपावली खऱ्या अर्थाने गोड करावी असा संदेश शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी यावेळी दिला


