तळबीड पोलिसांची मोठी 15 लाखांची रोकड हस्तगत, सन 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील पोलीस यंत्रणा अलर्ट.
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
राज्यांत विविध ठिकाणी ऐंन आचारसंहिता काळात कारवाई करून तळबीड पोलिसांनी जवळपास 15 लाखांची रोकड हस्तगत केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या रक्कम वाहनांतून नेल्या जात असल्याने पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक पोस्टवर कसून तपासणी केली जात आहे. ज्या वाहनांतून 15 लाख रुपयांची रोकड जात आहे ते वाहन देखील तळबीड पोलिसांनी ताब्यांत घेतले आहे. दरम्यान तासवडे टोल नाक्यावर सापडलेली 15 लाख रुपये नेमके कोणाचे? कुठून कुठे चालले होते याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सध्या हे वाहन आणि रोकड पोलिसांच्या ताब्यांत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. तळबीड पोलीस ठाण्याकडूंन मिळालेल्या सविस्तर माहितीवरून विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने तासावडे टोल नाक्यावर तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक विशेष कारवाई करण्यात आली.दि 26 ऑक्टोंबर रोजी पहाटे 1 ते 4 च्या सुमारांस कराडहून सातारा कडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक ( 27 ई.ई 8737 ) या वाहनांतून संशयास्पद स्थितीत आढळल्याने 2:30 वा. तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान वाहनांमध्ये तब्बल 15 लाख रुपयांची रोख रक्कम तळबीड पोलीस ठाणेच्या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली सुरक्षित ठेवण्यात आली. निवडणूक प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर पुढील तपासणीसाठी मागील व पुढील लिंकचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. निवडणुका जशा जवळ येतील तसं अधिक कसून तपासणी होत राहतील असेही जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि पोलीस ठाणेकडील सर्व पोलीस अंमलदार हवालदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर कारवाई मध्ये सहभाग असणारे प्रभारी अधिकारी यांच्यासह पोलीस ठाणेतील कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले.


