अमृतेश्वर शिवजयंती उत्सव समिती मोहरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव संपन्न झाला.
मंगेश पवार
मोहरी बु ता. भोर या ठिकाणी दोन दिवसीय सोहळा खुप आनंदात पार पडतो.दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी रांगोळी स्पर्धा तसेच जागर शिवरायांच्या पराक्रमाचा हा कार्यक्रम दाखविण्यात आला या कार्यक्रमात शिवजन्मापूर्वीपासून ते शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापर्यंत कार्यक्रम दाखविण्यात आले तसेच रांगोळी स्पर्धेत समाज प्रबोधनात्मक रांगोळी आकर्षक दाखविण्यात आल्या आणि समाजाला एक संदेश देण्याचा या रांगोळी स्पर्धेचा प्रमुख उद्देश मंडळाचा होता यामध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मंडळाला मिळाला
तसेच दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी श्रीक्षेत्र वडू बुद्रुक तुळापूर या गावातून अमृतेश्वर मंदिरामध्ये ज्योत आणण्यात आली तसेच ढोल ताशाच्या गजरात शिवछत्रपतींचे शाही मिरवणूक काढण्यात आली तसेच डॉक्टर गोगावले सर यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले आणि शिवजयंती उत्सव मंडळाने मान्यवरांचे आभार मानले तसेच सायंकाळी शिव भोजन आणि रात्री दहा वाजता नुकताच प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट दाखविण्यात आला.


