धनगर बांधवांची ऐतिहासिक सहल!अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी जन्मस्थळाला भेट


संपादक दिलीप वाघमारे

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच त्यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या औचित्याने गुळुंब गावातील धनगर बांधवांनी चौंडी येथील जन्मस्थळाला भेट देत इतिहासाचा गौरवशाली ठेवा अनुभवला.सहलीची सुरुवात यांच्या हस्ते जेष्ठ मार्गदर्शक अंकुश जाधव व सतीश जाधव हस्ते श्रीफळ वाढवून व गाडीचे पूजन करून करण्यात आले.

 

धनगर समाजाच्या मासिक बैठकीत दीपक पारखे यांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सर्वजण ऐतिहासिक सहलीसाठी चौंडीला रवाना झाले. राजवाडा परिसर आणि तेथील सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष अनुभवताना उपस्थितांना राजमाता अहिल्यादेवींच्या पराक्रमाची व समाजहितासाठी केलेल्या कार्याची प्रेरणादायी माहिती मिळाली.

ADVERTISEMENT

 

विशेष म्हणजे राजवाड्यातील ‘खलबत्त खाना’ या ऐतिहासिक सभागृहात समाजातील विषयांवर चर्चा करून बांधवांनी त्या परंपरेची आठवण ताजी केली.

 

या सहलीत जेष्ठ मार्गदर्शक सुरेश पारखे, दादासाहेब पारखे, अविनाश भोजने, सतीश पारखे, सुभाष पारखे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश देवडे,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. सुवर्णा लांबाते, माजी सदस्य सौ. मनीषा पारखे, राजेंद्र भोजने, विजय देवडे, किरण लांबाते, महादेव भोजने, सुनील पारखे, शिवाजी लांबाते यांच्यासह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

समारोपावेळी राजेंद्र भोजने व राजेंद्र पारखे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!