सारोळे गावचे सुपुत्र व वरिष्ठ अभियंता नितीन चव्हाण यांचे आकस्मिक निधन
सारोळे (ता. भोर) प्रतिनिधी :
सारोळे गावातील सुपुत्र व वरिष्ठ अभियंता मा. श्री. नितीन शिवाजी चव्हाण (वय ४३ वर्षे) यांचे शनिवार दि. २३ रोजी सकाळी आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सारोळे गावासह भोर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नितीन चव्हाण हे अभ्यासू, कर्तृत्ववान व सर्वांना आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. ते सॅन्डविक या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ अभियंता पदावर कार्यरत होते. कामाच्या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यातही त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या निधनाने एक हसतमुख व लोकाभिमुख व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांत शोककळा पसरली आहे.
त्यांचा अंत्यविधी शनिवार दि. २३ रोजी सायंकाळी ५ वाजता सारोळे (ता. भोर) येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे पार पडला.
ईश्वरचरणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना.


