केडंबे येथे प्राचीन शिवकालीन वस्तू व शस्त्रास्त्रे यांचे भव्य प्रदर्शन .
सातारा जिल्हा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, (केडंबे) यात्रेनिमित्त आज दि. १५ /०१ / २०२५ रोजी प्राचीन शिवकालीन वस्तू व शस्त्रास्त्रे यांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे .
यासाठी सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक, शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक व भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य प्रसाद कृष्णराज बनकर, रविवार पेठ वाई यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील शिवकालीन वापरात नसलेली, धार विरहित व केवळ अभ्यासासाठी संग्रहीत केलेली शस्त्रास्त्रे आणि जुन्या वस्तुंचे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भरविणार आहोत. समाजातील सर्व नागरिकांना आपला गौरवशाली इतिहास माहित व्हावा, तसेच दुर्मिळ वस्तू प्रत्यक्ष पाहाता याव्यात आणि इतिहासाला उजाळा मिळावा व आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे स्मरण व्हावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तरी या विधायक उपक्रमास आपण उपस्थित रहावे असे आव्हान शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य केडंबे संस्थापक समाधान ओंबळे ,अध्यक्ष प्रथमेश भणगे , उपाध्यक्ष रणजित ओंबळे , सचिव अनिकेत ओंबळे , प्रसाद ओंबळे यांनी केले आहे