पोलीस असल्याची बतावणी करून भोर कापूरहोळ रोडवरील संगमनेर गावच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकास लुटले.
भोर : भोर कापूरहोळ रोडवरील संगमनेर गावच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकास पोलीस असल्याचे सांगून सोन्याची चैन घेऊन अज्ञात चोरट्यांनी भोरच्या दिशेने पलायन केले.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14/01/2025 रोजी दुपारी 12.30 वा. चे सुमारास मौजे संगमनेर गावचे हददीत स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरचे समोर भोर ते कापुरहोळ रोडवर सुरेश हवालदार हे कापुरहोळकडे जात असताना पाठीमागुन येणारे दोन अज्ञात इसमांनी पाठीमागुन मोटार सायकलवर येवुन सुरेश हवालदार यांची मोटार सायकलला मोटार सायकल आडवी मारून बाबा तुम्हाला आवाज देत आहे, तुम्हाला ऐकायला येत नाही का. त्यावेळी सुरेश हवालदार यांनी त्यास हेल्मेट मुळे आवाज आला नाही असे सांगितले. तेव्हा दोन इसम हे आम्ही पोलीस आहोत, भोरला काय झाले आहे हे माहीत आहे का? असे म्हणुन तुम्हाला आम्हाला चेक करावयाचे आहे असे म्हटले. त्यानंतर ते दोन इसम चेक करत असताना सुरेश हवालदार यांच्या खिशातील पैसे व गोबाईल त्याचेकडील रूमालामध्ये ठेवण्यास सांगितला. त्याप्रमाणे ठेवले त्यानंतर त्यांनी गळ्यातील सोन्याची चैन देखिल काढण्यास सांगितली. त्यावेळी सुरेश हवालदार यांना त्या इसमांचा संशय आल्याने त्यांनी 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकुण 90,000/- रू चा माल त्याचेकडे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्या दोन इसमांनी सुरेश हवालदार यांच्या गळ्यातुन सोन्याची चैन काढुन घेवुन भोरचे दिशेने मोटार सायकलवर पळून गेले आहेत. म्हणुन सुरेश हवालदार यांनी दोन अनोळखी अज्ञात चोरट्यांविरोधात राजगड पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.
याचा तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मदने नाना करीत आहेत.