श्री सदगुरू शंकर महाराज प्रकटदिन सोहळा संपन्न – हजारो भक्तांचा महाप्रसादाचा लाभ


कार्यकारी संपादक : सागर खुडे

पुणे, इंदिरानगर, बिबवेवाडी: योग योगेश्वर प्रतिष्ठान इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे ३७ यांच्या वतीने श्री सदगुरू शंकर महाराजांचा भव्य प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात भजनसेवा, महाप्रसाद आणि मान्यवरांचे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुमारे दोन ते तीन हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

या प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये बाबा मिसाळ, अश्विनी कदम, गणेश भोकरे, दर्शन गोरे, किशोर धनकवडे, दिनेश धाडवे, गणेश मोहिते, रोशन शिंदे, शशिकांत पापळ, सचिन पासलकर, विक्रांत अमराळे, राहुल गवळी, विशाल भोसले,संतोष यनपूरे, अतुल महांगडे, आणि ओंकार व्यास यांचा समावेश होता.

ADVERTISEMENT

 

कार्यक्रमात विशेष सन्मानाचा भाग म्हणून डॉ. मंदार माळी यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी एक हजार पेक्षा अधिक प्रसूती सेवा मोफत दिल्याबद्दल त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने विशेष पुरस्कार देण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे संयोजन राकेश कदम, पवन ओहाळ, आशिष तापकीर, शंकर थोरात, प्रथमेश उणेचा, यांनी केले.

प्रकटदिन सोहळ्याचा पारंपरिक उत्साह भक्तांना विशेष भक्तिभावाने एकत्र आणणारा ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!