सातारा-जावलीतील मुंबईकरांची साथ मोलाची – आ. शिवेंद्रराजे स्थानिकांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना राबवणार
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
आगामी काळात सातारा-जावली
विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा आणखी बदलून स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. आपले आशीर्वाद आणि प्रेम कायम ठेवून मला विक्रमी मताधिक्य द्या. सातारा-जावलीतील मुंबईकरांची साथ माझ्यासाठी लाखमोलाची ठरेल,असा विश्वास सातारा-जावली मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
मुंबईतील सातारा-जावलीकरांच्या मेळाव्यात बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले. व्यासपीठावर नरेंद्र पाटील, बळवंत पवार, वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे व इतर.
नवी मुंबई येथे आयोजित सातारा-जावली मतदार संघातील स्थानिकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, बळवंतराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावली बॅकेचे व्हा.चेअरमन चंद्रकांत दळवी , एकनाथ ओंबळे ,मच्छिंद्र आप्पा क्षिरसागर मा. जिल्हा परिषद सदस्य ,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्डेकर ,प्रशांत तरडे ,रामभाऊ शेलार , जयदीप शिंदे ,विजय आप्पा शेलार ,विजय शेठ शेलार,सागर धनावडे ,प्रदीप शेलार , नाना जांभळे , अक्षय चिकणे , मुंबईतील बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, उपाध्यक्ष संदीप शेलार, के. के. शेलार, श्रीरंग केरेकर, दत्ता गावडे, शांताराम कदम शिवसेना ता. प्रमुख, हभप प्रविण महाराज,शामराव मर्ढेकर,चंद्रकांत वेंदे,विजय सावले,राहूल धनावडे,विनोद शिंगटे , सुभाष धनावडे , राजकुमार धनावडे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते असंख्य नागरिक उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा
जावली तालुक्यात विविध योजना आणि विकासकामे मार्गी लावून आपल्या मतदारसंघाचा कायापालट केला आहे. सातारा व जावली तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात पर्यटन वाढ व्हावी आणि त्यातून स्थानिकांना रोजगार व व्यवसाय निर्मिती व्हावी यासाठी प्राधान्य दिले आहे. सातारा जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावून प्रत्येक गाव, वाडी, वस्तीतील लोकांना सुविधा पुरवण्याचे काम केले आहे. पर्यटन वाढ आणि व्यवसाय विधानस धुमशान वृद्धीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.
माझ्या मतदारसंघातील असंख्य लोक नवी मुंबई येथे नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक झाले आहेत. या सर्व मुंबईकरांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून यासाठी भविष्यातही या समस्या सोडवण्यासाठी मी अग्रभागी असेन.
बाबाराजेंना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार
आ. शिवेंद्रराजेंनी मतदारसंघात असंख्य विकासकामे मार्गी लावून आमच्या गावाचा, भागाचा सर्वांगीण विकास केला आहे. आमच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच सहकार्य करतात. बाबाराजेंना विक्रमी मताधिक्य देऊ, असा निर्धार उपस्थित हजारो मुंबईकरांनी यावेळी व्यक्त केला.