अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांना भोर,मुळशी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद


पुण्यभूमी न्यूज नेटवर्क

पक्षाचा विचार न करता अनेक गावात जाहीर पाठिंबा.

भोर: भोर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पै.कुलदीप कोंडे यांना भोर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. पक्षांचा विचार न करता कार्यकर्ते ग्रामीण भागात तात्याना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेली अनेक वर्ष भोर विधानसभा च्या राजकारणात कुलदीप कोंडे यांनी विकास कामाच्या माद्यमातून कार्यकत्यांची जी मोट बांधली ती आजही कायम आहे. त्यामुळे भोर विधानसभेत पै. कुलदीप कोंडे यांचा विजय कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास कोंडे यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. कोंडे ह्यांनी सध्या भोर, राजगड,मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करीत तेथील जनतेचे आशीर्वाद मागीतले आहेत. त्यासाठी ते डोअर टू डोअर जावून आपली अपक्ष उमेदवार व चिन्ह रिक्षा हे पटवून देताना दिसत आहेत.

 

राजकारणाच्या पलीकडील व्यक्तिमत्व आहे अशी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे

पक्ष नाही तर तात्यांसाठी मतदान करायचं असं लोकांचं मत आहे

पक्षपातिचे राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा असे आवाहन राजापूर गावचे युवा हर्षद बोबडे सर, मा. सरपंच विकास चव्हाण,दिलीप तनपुरे, बाळासाहेब शेडगे,संदिप सोनावणे यांनी केले.

 

कुलदीप कोंडे यांना कुठल्याही राजकीय वारसा नसताना त्यांनी वेळू भोंगवली जि.प.

ADVERTISEMENT

मतदारसंघात त्यांनी जम बसवणे कुणालाही जमणार नाही. जि. प. सदस्य असताना वेळू भोंगवली गणातील घरा -घरापर्यत विकासगंगा पोहचवली आहे.

 

कुलदीप कोंडे हा शेतकरयांचा पोरगं आहे.शेतातील बैलजोडीची आसुड काढ कशी बांधायची इथपासुन ते गाई म्हशींच्या धारा कशा काढायच्या इथपर्यंत स्वता हातात नांगर धरून शेती वजवतो.ज्यांच्या नावावर फक्त शेती आहे.पण कधी शेतात पण गेले नाही.त्यांना काय शेतकरयांच्या भावना कळणार.ऊस पिकवणारा शेतकरी सरी दोरीत काम करत ऊस पिकवत असतो.पण त्यांच्या ऊसाला कवडीमोल भाव मिळतो.ही तर खरी शोंकातिका आहे.मी एक गरीब शेतकऱ्यांचा पोरगा आहे.एकदा मत देऊन पहा.तुमच्या मतांच्या किमतीसारखे काम केले नाही.तर परत मत मागायला येणार नाही.असे भावनिक आव्हान कुलदीप कोंडे यांनी केले.

 

आमदार केल्यानंतर1 वर्षात तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी MIDC आणणार,जर MIDC आणली नाही तर बापाच नाव लावणार नाही.कमीत कमी 50 हजार युवकांना रोजगार मिळवून देणार.यासाठी एकदा संधी द्या.संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही.असे भोर विधानसभेचे अपक्ष पण बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारे उमेदवार कुलदीप कोंडे यांनी केले.व रिक्षा या चिन्हासमोरील अनुक्रमांक 5 नंबरचे बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा.विजय हा निश्चितच आहे.येणारया 20 तारखेला मतारूप आशिर्वाद द्या.विजय हा निश्चितच आहे.तो येत्या 23 तारखेला नक्कीच दिसेल.असा आत्मविश्वास व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!