मोफत वाळूसाठी 172 लाभार्थ्यांचे अर्ज : पाटण तहसीलदार अनंत गुरव


प्रतिनिधी: शंकर माने :डेरवण-एप्रिल 5,

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत तालुक्यामध्ये आतापर्यंत घरकुल पात्र लाभार्थी १७२ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी परिपूर्ण १५४ अर्ज पोर्टलवर नोंदणी केले असून, १८ घरकुल पात्र लाभार्थ्यांना त्रुटी पूर्तता पत्र दिल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज’ शी बोलताना .

याबाबत तहसीलदार गुरव म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाली आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना या सवलतीचा लाभ होणार आहे.

ADVERTISEMENT

यासाठी संबंधित घरकुल लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केले. त्यांचे अर्ज गौणखनिज पोर्टलवर नोंद होतो. संबंधित अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या ई- सेवा केंद्रात जाऊन शून्य रॉयल्टी असलेली पावती प्राप्त करून घेऊन वाळू डेपोमध्ये द्यायची आहे.

पाटण तालुक्यात आतापर्यंत १७२ घरकुल लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी परिपूर्ण १५४ अर्ज पोर्टलवर नोंदणी केले आहेत. १८ घरकुल लाभार्थ्यांना त्रुटी पूर्तता पत्र दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!