जि.प.प्राथ.शाळा न्हावी शाळेत पूर्वतयारी मेळावा अभियान,
दि.६ सारोळे :-पहिला टप्पा,जि.प.प्राथ.शाळा न्हावी शाळेत आज दि. 05/04/2025 रोजी आयोजित केला होता.एकच ध्यास,गुणवत्ता विकास,शाळेतले पहिले पाऊल, इ.1लीत दाखल होणारी निरागस बालके डोक्याला मुकुट व हातात फुगा घेऊन आनंदून गेली होती,त्यांचे कुंकवाच्या रंगात शाळेत उमटलेले पहिले पाऊल पुढील यशाची साक्ष देत राहील.विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळा पूर्व तयारीचा पहिला टप्पा यशस्वी करण्यात आला.यावेळी 7 टेबल वरील 1)विद्यार्थी नाव नोंदणी 2)शारीरिक विकास 3) बौद्धिक विकास 4) सामाजिक व भावनिक विकास 5)भाषा विकास 6)गणनपूर्व तयारी 7)मार्गदर्शन व साहित्य वाटप व छोटीशी भेटवस्तू देणेत आली.
CBSC पॅटर्न,निपुण महाराष्ट्र,गुणवत्तापूर्ण शिक्षण, सहशालेय उपक्रम, सर्वांगीण विकास याबाबत पालकांशी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी इडली,सांबर,खोबऱ्याची चटणी,जिलेबीचा आस्वाद घेतला
यावेळी गावातील मान्यवर पदाधिकारी,महिला पालक उपस्थित होते.श्री.अविनाश भोसले यांचे जेवण बनवणे कामी विशेष सहकार्य लाभले
कार्यक्रमाचे नियोजन संदीप मोरे, अनिल चाचर, रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे, उर्मिला भूतकर,गीतांजली पाटील यांनी केले.
मुख्य संपादक :मंगेश पवार
कार्यकारी संपादक :सागर खुडे