राज्य महिला आयोग सांगलीत, अनेक महिलांना मिळाला न्याय:- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर…!!
संभाजी पुरीगोसावी
राज्य महिला आयोगाचे कार्यालय हे मुंबई येथे असल्याने अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. त्यासाठी महिलांनी त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरांवर आपले म्हणणे मांडण्याकरिता महिला राज्य आयोग या उपक्रमांतून सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी पार पडली. सांगली जिल्हा दौऱ्यावर आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी बुधवारी सकाळी त्यांनी सांगली जिल्हाधिकारी नियोजन कार्यालयात सांगली कुपवाड मिरज यास जिल्ह्यातील पीडित महिलांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेत अनेक महिलांना जागेवरच न्याय मिळवून दिला आहे. ही जन सुनावणी आज सांगली जिल्ह्यात सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. राज्य महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतून सांगलीत जास्तीत जास्त पीडित महिलांनी या जनसुनावणीत सहभाग नोंदवून आपल्या समस्या आणि तक्रारी दाखल केल्या. महिलांनी न घाबरता आपली तक्रारी मांडाव्यात असे आव्हान रूपाली चाकणकरांनी केले होते. या जन सुनावणीनंतर त्यांनी जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन कामगार परिवहन आरोग्य शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी रूपाली चाकणकरांनी सांगली जिल्ह्यातील पोलिसांनी महसूल प्रशासनाचे देखील विशेष कौतुक केले.


