पेट्रोल डिझेल चोरी करणारे आरोपींच्या आवळल्या मुसक्या,9 लाख 431 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, आळेफाटा पोलीसांची दमदार कामगिरी.
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) पतिनिधी.
आळेफाटा पोलीस ठाणेचा पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी पदभार घेतल्यापासून सराईत गुन्हेगार तसेच दुचाकी चोर तसेच अवैध धंदे व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आळेफाटा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीवरून आळेफाटा तालुका जुन्नर गावच्या हद्दीत सोपान लक्ष्मण शिरतर रा. आळे ता.जुन्नर जि. पुणे यांच्या मालकीच्या टाटा कंपनीची 12 टायर गाडी क्रमांक एम. एच 14 ई.एम 7167 यामधील 200 लिटर डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चार चाकी वाहनांतून येवुन चोरी करून नेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शोध पथक हे सदर गुन्हेतील आरोपींचा व गुन्ह्यातील वापरलेल्या वाहनांचा शोध घेत असताना. गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपी गणेश लक्ष्मण क्षीरसागर (वय 22 ) रा. वाकी खर्द ता. खेड जि. पुणे आणि प्रत्येक मुकुंद फापाळे (वय 21) पाटीलनगर वाकी खुर्द ता.खेड जि. पुणे ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी पेट्रोल डिझेलची चोरी करीत असल्याने खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण वरील दोन आरोपींना ताब्यांत घेवुन त्यांच्याकडे आधी चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा साथीदारांसह केल्याची पोलिसांना कबुली दिली. सदर कारवाईमध्ये जवळपास 1 लाख 431रुपयांचे पेट्रोल डिझेल असा एकूण 9 लाख 431 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे सहा. पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे पो. हवा. राजेंद्र हिल भीमा लोंढे विनोद गायकवाड संजय शिंगाडे पंकज पारखे पंडित थोरात पो.अं. अमित माळुजे नविन अरगडे गणेश जगतात ओंकार खुणे तौफिक शेख विष्णू दहिफळे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.


