बाबाराजेंना आपले आंबेघर गणातून लीड द्या.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मेढा : सातारा – जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे हे विजयी झालेले आहेत . त्यामुळे त्यांना कोणत्याही स्टार प्रचारकाची आवश्यकता नाही पण त्यांच्या मोठ्या फरकाचे मताधिक्य वाढण्यासाठी प्रत्येक गावात, बूथवर लक्ष ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन भाजपचे सातारा जिल्हा विस्तारक विशाल वाळुंजकर यांनी आंबेघर येथे केले. जावली -सातारा विधानसभा भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आंबेघर तर्फे केळघर येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, मोहनराव कासुर्डे, युवा अध्यक्ष सागर धनावडे, शांताराम कदम तालुका प्रमुख शिवसेना,सुनिल जांभळे,शांताराम पार्टे, आदि उपस्थिती होते .
शिवेंद्रसिंहराजेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे यासाठी सर्वानी एकजूटीने प्रयत्न करावेत. प्रत्येक बूथ अध्यक्षांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपण विक्रमी मताधिक्य बाबांना द्याचं आहे . प्रत्येकांने साखळी तयार करून गाव, वाडी – वस्तीवर शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत.असे वाळुंजकर म्हणाले,
जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे म्हणाले विजय आपला आहेच पण आपल्या गणातून महाराज साहेबाना जास्त मोठ्या मतांनी लिड द्यायचं आहे त्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील कामानिमित्त बाहेर असणाऱ्या लोकांचे योग्य नियोजन करून त्यांना मतदान केंद्रावर आणण्याचे नियोजन केले पाहिजे . शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना व शिवसैनिक बाबा राजेंसोबतच आहेत फक्त बाबांना जास्तीत जास्त मताधिक्य देणेच काम आपण करायच आहे .
आंबेघर गणातून जास्तीत जास्त १००% मतदान भाजपा महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना करणेचा संकल्प सदर बैठकीमध्ये करण्यात आला . यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, बूथ प्रमुख, आजी – माजी सरपंच उपस्थित होते.