सारोळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा! श्रावणी शशिकांत धाडवे यांनी MHT -CET PCB Group मध्ये ९८. ५० परसेंटेज मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.


 

भोर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या सारोळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सारोळे गावातील शिक्षक शशिकांत धाडवे यांच्या मुलीला श्रावणी शशिकांत धाडवेला MHT -CET PCB Group मध्ये ९८. ५० परसेंटेज मिळाले आहेत.

 

श्रावणी धाडवे ही सारोळे गावातील शिक्षक शशिकांत धाडवे यांची कन्या आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन यश मिळवले आहे.

वडील शिक्षक तर आई गृहिणी असून शेती करत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये स्वतः दिवस-रात्र अभ्यास करून यश मिळवले आहे.

ADVERTISEMENT

 

शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज शारदानगर बारामती या कॉलेजमध्ये शनिवार दि. १३ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमावेळी राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांच्या हस्ते श्रावणी धाडवे हिचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

 MHT – CET च्या माध्यमातून गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे. त्यामध्ये युपीएससी,एमपीएससी करून मोठे अधिकारी होण्याचं स्वप्न आहे.निवड झाल्यानंतर गोरगरिब जनतेची कामे आणि देश सेवा करणार आहे.

श्रावणी शशिकांत धाडवे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!