आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेगांव पोलिसांचा रूट मार्च, कायदा सुव्यवस्था ठेवा: स.पो.नि. किरण भालेकर.


 

संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

राज्यांत सध्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे तसेच सण उत्सव साजरे होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन हे चांगलेच सतर्क झाले असून. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने घोडेगांव पोलिसांनी नुकताच रूट मार्च काढला आहे. सदर रूट मार्च हा घोडेगांव पोलीस ठाणेपासून ते ग्रामीण भागातील गावांमधून रूट मार्च करीत नागरिकांना पोलिसांनी सूचना केल्या. सदर रूट मार्च हा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्यासह पोलीस अधिकारी घोडेगांव पोलीस ठाणेकडील पोलिस अंमलदार तसेच सीआरपी जवानांसह आदींनी या रूट मार्चमध्ये सहभाग आपला नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!