फलटण- फलटण २५५. विधानसभा निवडणुक २०२४.बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रतिभा सुनील शेलार यांचा उमेदवारी अर्ज दाखल.


 

फलटण / सातारा: धर्मेद्र वर्पे.

सातारा फलटण- २५५ फलटण विधानसभा निवडणूक २०२४ बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रतिभा सुनील शेलार यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

सातारा जिल्ह्यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा सुनील शेलार या सामजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात दहा ते पंधरा वर्षां पासुन तांची संस्था सामाजिक कार्यात सहभागी असून महिला व मुलींना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस तत्पर असतात तसेच अनेक चुकीचा विषयांवर आवाज उठवणयासाठी निवेदने, आंदोलने,मोर्चे,उपोषण करून विषय मार्गी लावतात अनेक महिला व मुली यांना ब्युटी पार्लर टेलरिंग चे क्लासेस मोफत प्रशिक्षण देत असतात या उपक्रमातून हजार ते दीड हजार महिला प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर झाल्या आहेत.

तसेच लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रतिभा शेलार या अपक्ष उमेदवार ही होत्या त्या निवडणुकीत त्यांना बाराशेच्या दरम्यान मतदान आले होते.

ADVERTISEMENT

आताही त्या २५५ फलटण विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने हत्तीचे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत फलटण विधानसभा ही अनुसूचित जाती या उमेदवारासाठी राखीव जागा असल्यामुळे फलटण विधानसभा या मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्या हत्तीच्या चिन्हावर शिक्का मूर्तब करून उमेदवारी अर्ज दाखल केला. आहे.आणि त्यांना आशा आहे. की या २५५ फलटण विधानसभे मधून बहुमताने निवडून येतील आणि फलटण विधानसभेतील मतदार बहुसंख्य त्यांच्या समाजाचा आहे आणि त्यांना इतर समाज दुर्लक्षित करत असतो आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देत नाही जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या समाजाला आरक्षण मिळावून दिले आहे तरीसुद्धा या समाजाला इतर समाज स्वीकारत नाही त्यामुळे अशा समाजासाठी त्यांच्या समाजाचा व्यक्ती जर आमदार झाला तर त्यांचे अधिकाधिक दुःख यातना कमी होण्यास सुरुवात होईल.

त्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या पक्षप्रमुख व अध्यक्ष कुमारी बेहेनजी मायावतीजी व बहुजन समाज पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फलटण विधानसभेची जबाबदारी व उमेदवारी प्रतिभा सुनील शेलार यांना दिली आहे.त्यामुळे आज २५५ फलटण विधानसभा निवडणूक २०२४ या मतदार संघातून प्रतिभा सुनील शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांच्याबरोबर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रस्तावक दादासाहेब गायकवाड उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!