नागठाणे महाविद्यालय एन एस एस एककास व कार्यक्रमअधिकारी यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय पारितोषिक
उपसंपादक : दिलीप वाघमारे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
राष्ट्रीय सेवा योजना 2022-23 साठीचे नागठाणे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना एककास व कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप लोखंडे यांना सातारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त झाले.
नागठाणे महाविद्यालयाने एनएसएसच्या ‘मी माझ्यासाठी नाही तर इतरांच्यासाठी आहे ‘ या ब्रीदवाक्याचे पाईक होऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून व युवकांच्यात शिबिराच्या माध्यमातून श्रमसंस्कार रुजवत संस्कारशील नागरिक बनवण्याचा प्रयत्न करून शिवाजी विद्यापीठात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
महाविद्यालयाने कोविड काळामध्ये रांगोळी, मास्क वाटप व जनजागृती करिता विविध उपक्रम राबविले . एन एस एस च्या माध्यमातून सन 2014 पासून नागठाणे स्मशानभूमीची स्वच्छता आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबत केलेली जनजागृती या उपक्रमांची दखल विद्यापीठाकडून घेण्यात आली. म्हणूनच सन 2022 23 चा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना एककास उत्कृष्ट महाविद्यालय जिल्हास्तरीय पारितोषिक देऊन सन्मानित केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप लोखंडे यांना ही शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सातारा उत्कृष्ट कार्यक्रमअधिकारी जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झाले. डॉ. लोखंडे सलग ११ वर्ष राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ३ वर्षे सातारा ग्रामीण विभागीय समन्वयक व ३ वर्ष सातारा शहर आणि ग्रामीण विभागीय समन्वय तसेच कोविड-19 काळात सातारा जिल्हा नोडल ऑफिसर म्हणूनही काम केले आहे.
शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून पारितोषिक दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य, स्वयंसेवक आणि सर्व विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप लोखंडे यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी प्राचार्या सौ शुभांगी गावडे, सहसचिव (प्रशासन) डॉ मिलिंद हुजरे, सहसचिव (अर्थ )प्राचार्य एस एम गवळी, सातारा जिल्हा विभागीय प्रमुख प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी अभिनंदन केले.