गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींस परजिल्ह्यातून शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, शिरूर पोलिसांची दमदार कामगिरी,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपींला आपल्या काही तासात परजिल्ह्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (कृष्णा वैभव जोशी) असे या गोळीबार प्रकरणातील आरोपींचे नाव आहे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेवुन तपास पथकांला गुन्ह्यातील आरोपींच्या तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले होते, शिरूर पोलिसांनी अगदी कसून तपास करून त्याला परजिल्ह्यातून तपासी पथकांचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना बातमीदारांमार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी कृष्णा वैभव जोशी हा अहिल्यानगर बस स्थानकांतून राजस्थान कडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती, मिळालेल्या माहिंतीच्या आधारे तपासी पथकांने सापळा लावून आरोपी कृष्ण वैभव जोशी याला ताब्यात घेतले, सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपीकडूंन गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतुसे देखील हस्तगत करण्यात आले आहे, सदर आरोपी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकांचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप पोलीस अंमलदार विनोद काळे सचिन भोई विजय शिंदे निरज पिसाळ नितेश थोरात निखिल रावडे अजय पाटील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, शिरूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे,