न्हावी सोसायटीच्या चेअरमन पदी अंकुश चव्हाण तर व्हा. चेअरमन पदी दत्तात्रय सोनवणे यांची निवड.


पुण्यभूमी न्यूज नेटवर्क कारगिल संपादक :सागर खुडे

सारोळे : भोर तालुक्यातील नावाजलेली, नेहमी फायद्यात असणारी, संस्थेची स्वतःची दोन मजली भव्य इमारत असणारी आणि १३३७ सभासद, १,५०,००,००० (१.५० कोटी) पेक्षा जास्त भागभांडवल आणि आर्थिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये २० लाख नफा असलेली आणि दरवर्षी सभासदांना १०% प्रमाणे लाभांश वाटप करणारी, न्हावी सर्वे नंबर १५, न्हावी सर्वे नंबर ३२२, पेंजळवाडी आणि भांबवडे या चार गावांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या सर्वात मोठी विकास सोसायटी म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय भालचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या न्हावी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे युवा चेअरमन नवनाथ मोहन सोनवणे तसेच व्हा. चेअरमन लव्हा चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवडणूक आज सोसायटीच्या कार्यालयामध्ये पार पडली. यात आमचे हितचिंतक, प्रगतशील बागायतदार, उद्योजक तसेच पेंजळवाडी गावचे माजी उपसरपंच अंकुश रामचंद्र चव्हाण यांची चेअरमन पदी तसेच न्हावी ३२२ मधील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शामराव सोनवणे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.

ADVERTISEMENT

 

सदर प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि शांततेत पार पडली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांनी आदरणीय भालचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार यापुढेही सर्वांना बरोबर घेऊन पारदर्शकपणे चालू ठेवू. तसेच सभासद – शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून सोसायटीचा कारभार वाढवू याची ग्वाही देऊन, दिवाळीच्या अगोदर सर्व पात्र सभासदांना १०% लाभांश वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचे आश्वासन दिले.

निवडणूक प्रक्रियेसाठी भोरचे सहाय्यक निबंधक तावरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सदर प्रक्रिया पार पडताना सोसायटीचे मार्गदर्शक तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष तसेच सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे युवा नेते तसेच पेंजळवाडी गावचे माजी युवा सरपंच, उद्योजक शिवभक्त विकास चव्हाण यांच्यासह सोसायटीचे युवा चेअरमन नवनाथ मोहन सोनवणे, व्हा. चेअरमन लव्हाद चव्हाण यांच्याबरोबरच सोसायटीचे सर्व संचालक मंडळ तसेच सोसायटीचे सचिव संतोष वसंत सोनवणे आदीसह सभासद आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. आमचे दिवंगत सहकारी स्वर्गीय मोहन सोनवणे यांचे सुपुत्र तसेच चेअरमन नवनाथ सोनवणे यांनी सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचा कारभार सभासद – शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकपणे चालवला त्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तरी या बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेसाठी सर्व संचालकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार, तसेच त्यांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!