लोणंदमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी होणार
संपादक दिलीप वाघमारे
लोणंद (ता. खंडाळा) — विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त लोणंद येथे भव्य व प्रेरणादायी संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, लोणंद यांच्या वतीने हा उत्सव सामाजिक सलोखा, समता व प्रबोधनाचा संदेश देणारा ठरणार आहे.
उत्सवाची सुरुवात शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजता होणार असून स्टार प्रवाहवरील इंडियन आयडॉल, सोनी टीव्हीवरील सुर नवा ध्यास नवा तसेच ‘फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय’ फेम महाराष्ट्राचा युवा रॉकस्टार संतोष जोंधळे यांच्या भीमगीतांच्या भव्य कार्यक्रमाने वातावरण भारावून जाणार आहे.
शनिवार, ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बुद्धविहारात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन, दुपारी ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा, सायं. ४ वाजता निबंध स्पर्धा आणि सायं. ७ वाजता कथाकार-लेखक-वक्ते प्रा. विजय विमल जानराव काकडे यांचे “महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर, सायं. ८ वाजता ‘बुगी वुगी’ कार्यक्रम आयोजित आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजी सायं. ८ वाजता ‘सम्राट समाज प्रबोधन गायन पार्टी’तर्फे ‘जलसा परिवर्तनाचा’ विचारांची प्रस्तुती होणार आहे. मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण व समता सैनिक दलाची मानवंदना, स. १० वाजता भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुद्धवंदन, सायं. ७ वाजता बक्षीस वितरण व सत्कार, तसेच खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. बुधवार, १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता भव्य मिरवणूक व सर्वांसाठी सस्नेह भोजनाने उत्सवाची सांगता होईल.
या सोहळ्याचे अध्यक्ष आयु. निखित सुरेंद्र खरात, उपाध्यक्ष इंजि. स्वप्नील अरुण वाघमारे व अमित अनिल खरात, कार्याध्यक्ष आयु. सुनित नामदेव खरात (आण्णासो), सचिव आयु. अक्षय विश्वास दगडे, सहसचिव सौरभ सोमनाथ खरात, कोषाध्यक्ष आयु. संतोष बाळकृष्ण खरात यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ सूरज नंदकुमार खरात, लोकेश सुनील खरात, करण बापू गायकवाड,सुहास बाळासाहेब कांबळे, शैलेंद्र दत्तात्रय खरात, अशोक द. माळी,प्रकाश शिवाजीराव डोईफोडे, आकाश राजेंद्र खरात,निलेश दत्तात्रय डोईफोडे, निखिल रविंद्र खरात,रविंद्र खंडेराव खरात, अमोल अशोक खरात,दिपक मुरलीधर घाडगे, साहिल गौतम खरात,राहूल रघुनाथ खरात, विनीत बिपीन खरात,
निलेश खरात, पुणित खरात,आदित्य रविंद्र खरात, रितेश दिलीप जाधव.मार्गदर्शक,बाळकृष्ण खरात, नंदकुमार खरात, सुरेंद्र खरात,यशवंतनाना खरात, सी. के. खरात, शैलजाकाकी खरात,भैय्यासाहेब खरात, किरणनाना खरात,बौद्धाचार्य दत्तात्रय खरात, उमेशभाऊ खरात,सज्जन खरात, संतोष मा. खरात,कायदेशीर सल्लागार – अॅड. हेमंत खरातसमस्त खरात मंडळ, भारतीय बौद्ध महासभा महिला-पुरुष शाखांचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


