राजगड(वेल्हा)तालुक्यातील पुणे येथील रहिवासी नागरिकांचा संवाद मेळावा आंबेगाव बुद्रुक येथे संपन्न!भोर राजगड (वेल्हा) मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
दि. २० पुणे प्रतिनिधी : संग्राम थोपटे यांनी उपस्थित नागरिक यांच्या बरोबर सवांद साधला यावेळी राजगड तालुक्यातील ५० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच अनेक पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.
प्रसंगी वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष संतोष रेणुसे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानासो राऊत, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, मा.सभापती दिनकरराव सरपाले, सीमाताई राऊत, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ.संभाजी मांगडे, संदीप नांगीने, महिला अध्यक्षा आशाताई रेणुसे, भोर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे, वेल्हा तालुका युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे, काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कार्यकर्ते, राजगड(वेल्हा)तालुक्यातील पुणे स्थित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


