दरोड्याच्या प्रयत्नात असणा-या गुन्हेगारांच्या मुसक्या भुईंज डीबी ने आवळल्या.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
दिनांक ११/०६/२०२४ रोजी रात्री भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पोउपनिरीक्षक विशाल भंडारे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे शासकीय वाहनातून सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावार पेट्रोलींग करीत
असताना सपोनि गर्जे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे वेळे ता. वाई गावचे हद्दित करुणा मंदिरचे समोरील बाजुस, पुणे ते सातारा हायवे रोडचे पुर्व बाजुला झाडीमध्ये अंधारात पाच लोक त्यांच्या मोटर सायकल बाजुला लावून बसले असुन ते महामार्गावरुन जाणा-या लक्झरी बस लुटणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सपोनि गर्जे यांनी तात्काळ समीर शेख, भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक
सातारा, बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग तसेच अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना माहिती दिली. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयीतां
ताब्यात घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सपोनि रमेश गर्जे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी- अंमलदार यांनी साध्या वेशात मिळाले माहितीचे ठिकाणी जावून खात्री केली. त्यानंतर सोबतच्या पथकासह सापळा लावुन रात्री २१.३० वाजणेचे सुमारास अंधारात बसलेल्या दरोडयाच्या तयारीत असलेल्या ४ संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचे सोबत असलेला पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. परंतु ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडे विचारपूस केली असता ते पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातुन येवुन खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून त्यातील प्रवाशांचे दागिने, पैसे लुटण्यासाठी त्या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. मंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये एक सुरा, दोन लोखंडी रॉड, प्लॅस्टिकच्या पिशवीत मिरचीची पुड, मोबाईल तसेच दोन मोटर सायकल असे एकूण २ लाख ७९ हजार रुपयाचे साहित्य मिळुन आले आहे. याबाबत पो. कॉ. रविराज वर्णेकर यांच्या तक्रारीवरुन भुईज पोलीस ठाणे गु.र.नं १९८ / २०२४ भादवि कलम ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन पळून गेलेल्या ३० ते ३५ वयोगटातील पाचव्या आरोपीचा शोध सुरु आहे.
आरोपींची नावे –
१) संतोष बाळासाहेब चव्हाण
२) अक्षय दत्तात्रय शितोळे
३) सिध्दांत यशवंत कांबळे
४) योगेश आनंदा वाळूंज


